रत्नागिरी : आज सायंकाळी रंगणार भव्य ‘ऑल इंडिया मुशायरा’; देशभरातील नामवंत शायर होणार सहभागी, प्रवेश मोफत

रत्नागिरी, ता. ८: रत्नागिरी शहरातील काव्यप्रेमी आणि रसिकांसाठी आज (शनिवार, दि. ८ नोव्हेंबर २०२५) एका भव्य ‘ऑल इंडिया मुशायरा’ आणि ‘कवी संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘कोकण 24 तास न्युज चॅनल’ रत्नागिरी यांनी आयोजित केलेली ही शायरी आणि कवितेची बहारदार मैफिल आज सायंकाळी ठीक ५ वाजता थिबा पॅलेस रोड, माळ नाका येथील जयेश मंगल पार्क येथे रंगणार आहे.

या भव्य कार्यक्रमासाठी देशभरातील सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय शायर, कवी व कवयित्री रत्नागिरीत दाखल झाले असून, ते आपली अदाकारी (सादरीकरण) पेश करतील. या कार्यक्रमासाठी रत्नागिरीकर रसिकांना सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या काव्यमैफिलीचा आनंद लुटण्याचे जाहीर निमंत्रण आयोजकांनी दिले आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला आहे.

देशभरातील दिग्गजांची उपस्थिती
या ‘ऑल इंडिया मुशायरा’साठी मध्यप्रदेशातील दिपक जैन हे मुख्य संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत, तर रत्नागिरी ऑल इंडिया मुशायरा कमिटीचे अध्यक्ष अलिमियाँ काझी हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन (निवेदन) सुप्रसिद्ध निवेदक जियाउल्लाह खान ‘जिया’ करणार आहेत.

मुशायरा’मध्ये सहभागी होणारे नामवंत कवी व शायर:
या कवी संमेलनात भारतातील विविध राज्यांतून आलेले नामवंत कलाकार आपली कला सादर करतील, त्यांची नावे खालीलप्रमाणे:

खुर्शिद हैदर (उत्तरप्रदेश)

सुंदर मालेगावी (मालेगाव, महाराष्ट्र)

नकहत अमरोही (अमरोहा, उत्तरप्रदेश)

सिराज अहमद ‘स्वान’ (सनामिरी)

सुहाना नाझ (मुंबई)

अफझाल दानिश (मध्यप्रदेश)

झहीर अख्तर (मालेगाव)

सरीता सरोज (रायपुर, छत्तीसगड)

मोईन अचलपुरी (अमरावती)

‘कोकण 24 तास’ न्युज चॅनलच्या वतीने सर्व रत्नागिरीकर नागरिकांना या अभूतपूर्व सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी आणि या कवी संमेलनाला यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 08/Nov/2025