खेड : कशेडी गावणकर शाळेत विद्यार्थी सुरक्षितताविषयी पोलिसांकडून मार्गदर्शन

खेड : तालुक्यातील कशेडी गावणकर शाळेत विद्यार्थी सुरक्षितता विषयी पोलिस निरीक्षक कमल दुधाळे यांचे मार्गदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले होते. तालुक्यातील कशेडी गावणकर या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत सखी सावित्री समिती व विद्यार्थी सुरक्षितता समिती यांची संयुक्त सभा नुकतीच झाली. मुख्याध्यापक प्रभाकर कोळेकर यांनी सभेचे प्रास्ताविक केले. या सभेत खेड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक कमल दुधाळे यांनी विद्यार्थी सुरक्षितता याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे, अनोळखी व्यक्तींच्या प्रलोभनापासून कसे दूर राहावे, चांगला स्पर्श व वाईट स्पर्श कसा ओळखावा, पालकांनी आपल्या पाल्याची कशी काळजी घ्यावी इत्यादी बाबतीत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी खेड पोलीस स्थानकातील महिला समुपदेशक जान्हवी केळूसकर यांनी उपस्थित पालकांना व ग्रामस्थांना गृह कलह, आपापसातील वाद व तंटा शांततेच्या मागनि कसा मिटवावा याबद्दल समुपदेशन केले. यावेळी सरपंच संजय दरेकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष कमलाकर साळवी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन मादगे, उपाध्यक्षा हर्षदा खसासे, पोलीस श्रीकांत पवार, पोलिसपाटील स्वरा गावणकर, पदवीधर शिक्षक मंगेश चाळके, उपशिक्षक मनोहर पेंडखलकर उपस्थित होते मुख्याध्यापक प्रभाकर कोळेकर यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:53 PM 24/Oct/2024