Ratnagiri : टपरीच्या आडोशाला जुगार चालवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे ते रेल्वेस्टेशन जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर एका टपरीच्या आडोशाला जुगार खेळ चालवणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.२१ वा. करण्यात आली. रवींद्र सीताराम पवार (४५, मुळ रा. सायन मुंबई, सध्या रा. पाडावेवाडी मिरजोळे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल राकेश तटकरी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी सायंकाळी संशयित हा त्या ठिकाणी विना परवाना मटका जुगाराचे साहित्य बाळगून जुगार खेळ चालवत असताना ही कारवाई करण्या आली. त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 10/Nov/2025