Khed Nagar Parishad : सार्वत्रिक निवडणूक बैठकीत मतदान केंद्रांची यादी जाहीर

खेड : खेड नगर परिषदेत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर शनिवारी नगर परिषद सभागृहात विशेष बैठक झाली. यावेळी खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी मतदान केंद्रांची प्राथमिक यादी जाहीर करण्यात आली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर सोनवणे, खेड नगर परिषद मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महादेव रोडगे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, नागरिक, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. याचवेळी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नगर परिषद निवडणुकीसंबंधी प्राथमिक नियोजन, प्रशासनिक तयारी व मतदान केंद्रांची पाहणी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल.

दरम्यान, खेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी मतदान केंद्रांची प्राथमिक यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण २० मतदान केंद्रांचा समावेश असून, त्यांची ठिकाणे पुढीलप्रमाणे : प्रभाग १: जिल्हा परिषदेची मराठी शाळा क्र. २, क्षेत्रपालनगर मतदान केंद्र १ दक्षिणेकडील खोली क्र. १, मतदान केंद्र २ पश्चिमेकडील खोली क्र. २, प्रभाग २: अल मदिना वेल फेअर असोसिएशन इंग्रजी शाळा (नवीन इमारत) मतदान. केंद्र १ पूर्वेकडील खोली क्र. १, मतदान केंद्र दक्षिणेकडील खोली क्र. २, प्रभाग क्रमांक ३ : अल मदिना वेल फेअर असोसिएशन इंग्रजी शाळा मतदान केंद्र १ पश्चिमेकडील खोली क्र. १, मतदान केंद्र पश्चिमेकडील खोली क्र. २, प्रभाग क्रमांक ४ जिल्हा परिषद शाळा १, मतदान केंद्र १ पूर्वेकडील खोली क्रमांक २, मतदान क्रमांक २-पूर्वेकडील खोली क्रमांक ४, प्रभाग क्रमांक ५ : एल.पी. इंग्लिश स्कूल खेड मतदान क्रमांक १-पूर्वेकडील खोली क्र. १, मतदान केंद्र २-दक्षिणेकडील खोली क्र. २, प्रभाग क्रमांक ६ श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल मतदान केंद्र क्रमांक १-पश्चिमेकडील खोली क्र. ४, मतदान केंद्र २ पश्चिमेकडील खोली क्र. ६, प्रभाग क्रमांक ७: जिल्हा परिषद केंद्रीय शाळा क्र. ३ मतदान केंद्र क्र. १ -पश्चिमेकडील खोली १, मतदान केंद्र २ पश्चिमेकडील खोली ५, प्रभाग ८ : एल.टी. टी हायस्कूल मतदान केंद्र १ दक्षिणेकडील खोली क्र. ६, प्रभाग ९ : हाजी एस. एम. मुकादम हायस्कूल मतदान केंद्र १ पश्चिमेकडील खोली क्र. ५, मतदाना केंद्र २ -पश्चिमेकडील खोली क्र. १०, प्रभाग १०: अंजुमन तालीम उर्दू शाळा, बंदररोड खेड मतदान केंद्र १-पश्चिमेकडील खोली क्र. १, मतदान केंद्र २ उत्तरेकडील खोली क्र. २. नग रपरिषद मुख्याधिकारी महादेव रोडे यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी सर्व विभाग सज्ज आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 10/Nov/2025