दापोली : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील आढावा बैठक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील पेन्शनर हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी रणनीती, संघटनात्मक तयारी आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा होणार आहे. या सभेला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका सचिव नरेंद्र करमरकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 11/Nov/2025












