Chiplun : पेढे ग्रामविकास मंडळाच्या वतीने ‘वाचनालय आपल्या दारी’ उपक्रम

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर व पेढे ग्रामविकास मंडळ यांच्या तर्फे ‘वाचनालय आपल्या दारी’ उपक्रम सुरु झाला. यानिमित्त पेढे कोष्टेवाडी येथील कामधेनू मंदिरात महिला वाचकांचा मेळावा पार पडला.

रागिणी वारे यांनी स्वागत, तर पेढे ग्रामविकास मंडळ अध्यक्ष सुनील पडवेकर यांनी प्रास्ताविक केले. लोटिस्मा ग्रंथालय कोषाध्यक्ष सुबोध दीक्षित, कार्याध्यक्ष अरुण इंगवले यांनी यांनी मार्गदर्शन केले. पेढे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक रामप्रसाद कान्हेरे यांच्या संकल्पनेतून उपक्रम राबवला. कान्हेरे यांनी वाचनालयांमध्ये सातत्य दाखवणाऱ्या महिलांसाठी रोख बक्षीस जाहीर केले. मंडळ उपाध्यक्ष गजानन भोसले, सदस्य जनार्दन मालवणकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा माधुरी वारे यांनी मनोगत व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 11/Nov/2025