रत्नागिरी : मिऱ्या- मुरुगवाडा किनारपट्टीवरील बंधाऱ्याचे काम पुन्हा सखडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. समुद्राच्या उधाणामुळे किनारपट्टीवरील घरे, रस्ते आणि शेतीला वारंवार धोका निर्माण होत असल्याने हा बंधारा स्थानिकांसाठी जीवदान ठरणार आहे. मात्र, कामाचा वेग मंदावल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
या बंधाऱ्याच्या कामाचा उद्देश किना-याचे क्षरण थांबवणे आणि समुद्रातील लाटांमुळे होणारे नुकसान कमी करणे हा आहे. काही वर्षापूर्वी सुरू झालेले हे काम प्रशासकीय विलंब, ठेकेदाराची उदासीनता आणि वनविभाग तसेच नगर परिषद हद्दीच्या वादात अडकले होते. अखेर या प्रश्नांचे निराकरण होऊन गेल्या वर्षी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली, मात्र आतापर्यंत फक्त २० ते ३० टक्केच काम पूर्ण झाले आहे.
मिऱ्या ते मांडदरम्यान दगड टाकून बंधाऱ्याला प्राथमिक आकार देण्यात आला. पण मुरुगवाडा भागातील काम पावसाळ्याच्या सुरुवतीपूर्वीच थांबले. सध्या दोन जेसीबी या किनाऱ्यावर निष्क्रिय अवस्थेत पडून आहेत, तर कामगारही मागे फिरले आहेत. ठेकेदाराकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने स्थानिकांच्या सहनशीलतेचा अंत होत आहे.
या भागात पावसाळ्यात मोठ्या लाटांमुळे परे आणि झाडांचे मोठे नुकसान झाले होते. काहींच्या कंपाऊङमध्ये समुदाचे पाणी शिरले होते, तर माती बाहुन गेली. त्यामुळे नारळांची झाडे कोसळली होती. त्यामुळे नागरिकांना बंधाऱ्याच्या कामाची तातडीची गरज भासत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अनेक वेळा याचाबत आवाज उठवला आहे. ‘ठेकेदारावर तत्काळ कारवाई करून कामाला वेग द्यावा. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,’ असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
बंदर विभागाकडून या कामासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या निधीचा योग्य वापर न झाल्यास तपासणी करून ठेकेदाराबर दंडात्मक कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे. समुद्रकिनाऱ्याचे नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास किनारपट्टीवरील अनेक घरांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता एका स्थानिक नागरिकाने बोलताना वर्तवली आहे.
या बंधाऱ्याचे गेल्या अनेक दिवसांपासून रखाडलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित विभाग आणि ठेकेदार यांच्यात समन्वय घडवून आणणे अत्यावश्यक ठरले आहे, अन्यथा किना-याच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 11/Nov/2025














