Ratnagiri : कळंझोडीच्या संजय शितप यांना आरोग्य सेवारत्न पुरस्कार प्रदान

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी गावचे सुपुत्र व लोकनेते शामराव पेजे सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते संजय शितप यांना नुकतेच रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात महात्मा जोतीराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने १५ व्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत राज्यस्तरीय आरोग्य सेवारत्न नागरी पुरस्काराने देऊन गौरविण्यात आले.

शितप यांनी मागील अनेक वर्षे खंडाळा परिसरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात लोकनेते शामराव पेजे सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था व या संस्थेसह विविध संस्थांच्या माध्यमातून सातत्याने वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

पुरस्कार वितरण प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कोकणचे गाडगेबाबा मारुतीकाका जोशी, मार्गदर्शक यशवंत निंबरे, सामाजिक कार्यकर्ते विकास पेजे, अरुण मोर्ये, महादेव आग्रे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 11/Nov/2025