Lepoard Attack : कोंढे येथे बिबट्याचा हल्लात बकरी ठार

दापोली : दापोली तालुक्यातील कोंढे, बोबले-शिगवणवाडी येथील लक्ष्मण धर्माजी बोबले यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार मारले. ही घटना ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की लक्ष्मण बोबले हे आपल्या शेळ्या रानामध्ये चारत असताना बिबट्याने अचानक हल्ला करून सुमारे १३ हजार रुपये किंमतीच्या गाभण बकरीला शिकार बनविले. या घटनेमुळे त्यांचे नुकसान झाले आहे. शेळीपालन हेच त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख उत्पन्नाचे साधन असल्याने या नुकसानीची भरपाई वन विभागाच्या माध्यमातून शासनाकडून मिळावी, अशी मागणी बोबले यांनी केली आहे. दरम्यान, वन विभागाने या घटनेची नोंद घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 11/Nov/2025