रत्नागिरी : तालुक्यातील चांदेराई ते कुरतडे जाणाऱ्या रस्त्यावर विनापरवाना हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत २६० रुपयांची पाच लिटर दारू जप्त केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. ९) सायंकाळी चांदेराई ते कुरतडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये निदर्शनास आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 11/Nov/2025














