Devrukh Nagar Panchayat Election : देवरूखमध्ये ५५८१ महिला तर ५२०८ पुरुष मतदार

साडवली : देवरूखमध्ये १७ प्रभागातील ११ केंद्रांवर मतदान होणार आहे. भोंदे शाळा क्रमांक ३ मध्ये तीन मतदान केंद्र असून काही शाळांमध्ये दोन मतदान केंद्रे आहेत. तीन ठिकाणी तपासणी केंद्रे व फिरती पथके लक्ष ठेवायला सज्ज करण्यात शहरात आली आहेत. देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून उमेदवार अर्ज स्वीकारणार असून, त्याची वेळ सकाळी १० ते ३ अशी असणार आहे. १९ ते २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतदान २ डिसेंबरला, तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.

नगरपंचायत इमारतीत अधिकारी निवडणूक निर्णय कार्यालय व मतपेट्यासाठी स्टाँग रूम असून कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. ३ डिसेंबरला मतमोजणीही नगरपंचायतीच्या आवारात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगमेश्वर तहसीलदार अमृता साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवरुख नगरपंचायतीसाठी ५२०८ पुरुष आणि ५५८१ महिला मतदार आहेत. महिलांची संख्या जास्त असल्याने नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या विजयात महिलांचा वाटा मोठा असणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 11/Nov/2025