संगमेश्वर : सोनवी पुलावर खड्ड्यांसह चिखल

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावरील सोनवी पुलावर खड्डेच खड्डे पडले असून पूल धोकादायक झाला आहे. संगमेश्वरजवळच्या आरवली ते बावनदी या अपघातप्रवण क्षेत्रात पूल धोकादायक बनले आहेत. महामार्गावरील पुलांवर पडत असलेल्या खड्डयांमुळे वाहन अडकून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठेकेदार कंपनीसह बांधकाम विभागाचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वाहनचालकांनी आणि पादचाऱ्यांनी केला आहे. याबाबत भाजपचे सरचिटणीस सतीश पटेल यांनी ठेकेदार कंपनीला सांगितल्यानंतर तात्पुरते खड्डे बुजविले होते. मात्र, नंतर पुन्हा खड्डे पडले आहेत. तसेच पावसामुळे या पुलावर खड्ड्यांबरोबरच चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पाऊस पडल्यानंतर तलावाचे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे वाहनचालकांची डोकेदुखी आणखीनच वाढला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 24/Oct/2024