चिपळूण आगारातील एसटी कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा

चिपळूण : चिपळूण-चोरवणे एस. टी. तून प्रवास करतेवेळी काजवेवाडीतील अमोल लांबे यांचा मोबाईल हरवला होता, पण ही एसटी आगारात गेली असताना चिपळूण आगारातील कर्मचारी गणेश सडकर यांच्या निदर्शनास मोबाईल आला. त्यांनी त्वरित अमोल लांबे यांच्याजवळ संपर्क केला आणि आगारामध्ये बोलावून मोबाईल देण्यात आला. प्रामाणिकपणाचे कौतुक म्हणून गणेश सडकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी चिपळूण आगार व्यवस्थापक दीपक चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी विजय थोरे, मनोज काजवे, मुराद चौगुले, स्वप्निल महाडिक आणि अमोल लांबे व एसटीतील कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:47 PM 24/Oct/2024