Sangameshwar : कसबा दख्खनी येथील शेडमध्ये गांजा ओढताना तिघांना अटक

देवरुख : नदीकिनारी असलेल्या मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गांजा ओढताना तिघांना संगमेश्वर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (९ नोव्हेंबर) सायंकाळी ७:०८ वाजण्याच्या दरम्यान कसबा दख्खनी मोहल्ला येथे करण्यात आली.

इम्रान अहमद वागळे (वय ३०, रा. डिंगणी मोहल्ला, सध्या रा. काझी मोहल्ला-कसबा, संगमेश्वर), आतिक सिद्धिक शहा (वय ३५, रा. कसबा दख्खनी मोहल्ला, संगमेश्वर) आणि तुषार प्रभाकर विचारे (वय ३८, रा. फणसवळे विचारेवाडी, संगमेश्वर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात हेडकॉन्स्टेबल उत्तम सासवे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानंतर हे तिघे रविवारी सायंकाळी कसबा दख्खनी मोहल्ला येथील शास्त्री – नदीकिनारी असलेल्या मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गांजा ओढत होते.

या तिघांकडून २०० रुपयांचा २ ग्रॅम ९२ मिली वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. त्याचबरोबर दोन चिलीम आणि काडीपेटीही त्यांच्याकडे सापडली. तिघांवर संगमेश्वर पोलिस स्थानकात एन. डी. पी. एस. अॅक्ट १९८५ कलम ८ (क), २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास संगमेश्वर पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 11/Nov/2025