सोलापूर : कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी पाच कोटी 18 लाख रुपयांचे दान केले. सोन्या चांदीचे दागिनेही अर्पण केले आहेत.
मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांनी दिली.कार्तिकी शुध्द 1 (दि. 22 ऑक्टोंबर) ते कार्तिकी शुध्द 15 (दि. 5 नोव्हेंबर) या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ चार कोटी 80 लाख आठ हजार 289 रुपये अर्पण, एक कोटी 27 लाख 19 हजार 520 रुपये देणगी, 54 लाख 16 हजार 500 रुपये लाडू प्रसाद विक्री, 71 लाख 59 हजार 910 रुपये भक्तनिवास, एक कोटी 77 लाख 15 हजार 227 रुपये हुंडीपेटी, 50 हजार रूपये पुजा तसेच 33 लाख 36 हजार 876 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 67 लाख 906 रुपये उत्पन्न प्राप्त झाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:37 11-11-2025














