Ratnagiri : वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी : शहरातील मांडवी-सदानंदवाडी रस्त्यावर निष्काळजीपणे दोन दुचाकींमध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या दुचाकीचालकाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

वैभव हेमंत सुर्वे (वय ३२, रा. मांडवी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ६) रात्री साडेआठच्या सुमारास मांडवी-सदानंदवाडी येथील रॅम्पपुढील रस्त्यावर घडली. संशयित सुर्वे गुरुवारी रात्री दुचाकी (एमएच ०८ बीएच ७७२८) सोबत पाठीमागे दीपक जगन्नाथ शिवलकर (वय ६०, रा. मांडवी, रत्नागिरी) यांना घेऊन मांडवी ते मिरकरवाडा रस्त्याने जात होते. त्यांच्या दुचाकीची दुसऱ्या दुचाकीला धडक बसली. यात मागे बसलेल्या दीपक शिवलकर यांचा मृत्यू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 12/Nov/2025