रत्नागिरी : प्रवासाला जाताना अनेकवेळा रेल्वे स्थानकावर सोबत आणलेले सामान कोठे ठेवायचे, असा प्रश्न प्रवाशांना असतो. त्यांच्यासाठी कोकण रेल्वेने रत्नागिरी, थिविम आणि उडुपी स्थानकांवर डीजी लॉकर सुविधा सुरू केली आहे. सुरक्षित आणि स्वतः ऑपरेट करता येईल, अशी सोय प्रशासनाने करून दिली आहे.
प्रवासी आता युपीआय, क्रेडिट किंवा डेबिट कार्डस् आणि इतर डिजिटल माध्यमांचा वापर करून आधुनिक क्युआर आधारित डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे त्यांचे सामान सोयीस्करपणे आणि सुरक्षितपणे ठेवू शकतात. ही सुविधा चोवीस तास कार्यरत आहे, ज्यामुळे सहज उपलब्धता सुनिश्चित होते आणि भारत सरकारच्या डिजिटल इंडिया चळवळीअंतर्गत डिजिटलदृष्ट्या सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला हातभार लागतो. या सुविधेमुळे प्रवाशांना त्यांचे सामान ठेवण्यासाठी एक सुरक्षित पर्याय निर्माण झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:21 PM 13/Nov/2025














