चिपळूण : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विक्रांत जाधव यांना थेट इशारा दिला. जाधव यांनी केलेले सर्व आरोप निराधार आहेत. भास्कर जाधव हे विधिमंडळातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या मुलांनी अशा प्रकारची वक्तव्ये करणे योग्य नाही. जाधव यांनी विकासावर बोलावे. स्वतःची बदनामी करून घेतली, आता दुसऱ्याची बदनामी करण्यात समाधान मानू नये, असा टोला कदम यांनी लगावला.
गृह राज्यमंत्री कदम हे चिपळुणातील सेना-भाजपच्या बैठकीसाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कदम म्हणाले, जाधव यांनी केलेले सर्व आरोप निराधार आहेत. पोलिस आपले काम स्वतंत्रपणे करत आहेत. कोणतीही नावे वगळण्याबाबत निर्देश दिलेले नाहीत. या प्रकरणाचे सत्य लवकरच समोर येईल.
खेड नगराध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवारीविषयी ते म्हणाले, वैभव खेडेकर यांनी उमेदवार असल्याचा स्टेटस ठेवला आहे. कोण काय स्टेटस ठेवतो, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. महायुती योग्यवेळी निर्णय जाहीर करेल. खेडेकर हे महायुतीत आहेत म्हणून सध्या त्यांच्यावर काही भाष्य करणार नाही. असेही ते म्हणाले. यावेळी शशिकांत चव्हाण, उमेश सकपाळ, संदेश आयरे, सुयोग चव्हाण, निहार कोवळे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 12/Nov/2025














