Chiplun Juna Kalbhairav Mandir : चिपळुणात आजपासून जुना कालभैरव जयंती उत्सव

चिपळूण : चिपळूण शहराचे ग्रामदैवत श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टतर्फे १२ व १३ नोव्हेंबर रोजी श्री कालभैरव जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री कालभैरव जयंती उत्सवात १२ व १३ रोजी सकाळी सनई चौघडा वादन, श्रींची नित्यनियमित पूजा-अर्चा, रात्री ७.३० वाजता कर्पूर आरती, नंतर श्री कालभैरव ध्यानं, स्तोत्र, अष्टक, कवच पठण इत्यादी धार्मिक विधी होतील. १२ रोजी श्री कालभैरव जयंती (कालाष्टमी), सकाळी १०.३० ते १ राष्ट्रीय कीर्तनकार हभप उदयबुवा फडके यांचे जन्मकाळ कीर्तन, दुपारी १ ते सायंकाळी ५ वा. श्री गांधारेश्वर भेटीसाठी श्रींची सवाद्य पालखी मिरवणूक निघेल.

सायं. ५ ते ७वा. स्वरदर्शन कलाकुंज चिपळूण प्रस्तुत संगीत स्वरसुमनांजली अंतर्गत पसायदान (श्री संत ज्ञानेश्वर यांच्या रचना) कार्यक्रम होईल. १३ रोजी लळीत, महाप्रसाद, सायं ६ ते ७.३० वा. श्री वेस मारुती भेटीसाठी श्रींची सवाद्य पालखी मिरवणूक निघेल. रात्री ९ ते १२.३० पर्यंत लळीताचे कीर्तन होईल. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापकीय विश्वस्त किशोर शेट्ये, समीर शेट्ये, महाजन विश्वस्त पंकज कोळवणकर (सचिव), कार्यकारी विश्वस्त सुमंता शिंदे, चंद्रशेखर लाड व जन्मोत्सव समिती अध्यक्ष संतोष डांगे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:13 PM 12/Nov/2025