नाणीज हायस्कूलच्या कार्तिक साळवीची राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी निवड

पाली (वार्ताहर) : माध्यमिक विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज नाणीजचा विद्यार्थी कार्तिक चंद्रशेखर साळवी याची धाराशिव येथे होणार्‍या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २०२४ यासाठी जिल्हा कुमार संघामधून निवड झाली आहे.

२० ऑक्टोबर रोजी डेरवण येथे झालेल्या खो – खो अजिंक्य पद व निवड चाचणी स्पर्धेत त्याने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले होते. शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचा नुकताच गौरव करण्यात आला होता.

कार्तिक याच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष प्रशांत कदम व इतर संस्थाचालक तसेच मुख्याध्यापिका रुपाली सावंतदेसाई व सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक – शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांनी त्याचे अभिनंदन करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

याआधीही नाणीज हायस्कूलची विद्यार्थिनी मंजिरी गावडे हीची बिहार येथे झालेल्या विभाग स्तरीय स्पर्धेमध्ये रनिंग मध्ये खेळून आली होती. नाणीज हायस्कूलच्या या यशाबद्दल परिसरातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:02 24-10-2024