रत्नागिरी ः महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित 64 वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह येथे सुरू झाली आहे.9 डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. एकूण 18 नाटकांचे प्रयोग सादर होणार आहेत.
सोमवारी सायंकाळी 7 वाजता तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे कार्यवाह वामन कदम, ज्येष्ठ रंगकर्मी दत्ता बोरकर आणि रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य राजेश गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडला. या वेळी परिक्षक विजय शिंगणे, डॉ संगिता टेकाडे व सुनील जगताप हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नंदू जुवेकर यांनी केले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 18 संघांचा सहभाग असून उद्घाटनानंतर दर्यावर्दी प्रतिष्ठान निर्मित अकल्पित नाटकाने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा, असे आवाहन संचालक विभीषण चवरे यांनी केलेले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 13-11-2025












