रत्नागिरी : पावस ते गावडेआंबेरे जाणाऱ्या मुख्या रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. ही कारवाई मंगळवार ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.५० वा. सुमारास करण्यात आली.
अभिषेक नथुराम बिर्जे (३३, रा. मावळंगे गजनेवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार संतोष करळकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सकाळी संशयित हा पावस ते गावडेआंबेरे जाणाऱ्या मुख्या रस्त्याच्या बाजूला तेथील पिकअप शेड या सार्वजनिक ठिकाणी आपल्याकडे दारू पिण्याचा कोणताही परवाना नसताना दारू पित होता. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 13/Nov/2025














