Guhagar Mahavikas Aaghadi : गुहागरमध्ये महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर

गुहागर : महाविकास आघाडीतर्फे पहिली यादी आमदार भास्कर जाधव यांनी जाहीर केली असून यामध्ये आठ महिलांचा समावेश आहे. मात्र उर्वरित नगरसेवक व नगराध्यक्षपदाचा सस्पेन्स महाविकास आघाडीने कायम ठेवला असून दोन दिवसांत ही यादी जाहीर होणार असल्याचे आ. जाधव यांनी सांगितले आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, उमेदवारांच्या जाहीर झालेल्या पहिल्या यादीमध्ये प्रभाग क्रमांक ३ मधून सतीश शेटे, प्रभाग क्र. ४ रिद्धी घोरपडे, प्रभाग क्र.५ कोमल जांगली, प्रभाग क्र. ७ निशा शेटे, प्रभाग क्र. ८ प्रगती वराडकर, प्रभाग क्र. ९ रिया गुहागरकर, प्रभाग क्र. १० वैशाली मालप, प्रभाग १२ मधून रूपा खातू, प्रभाग क्र. १६ राज विखारे, प्रभाग क्र. १७ मधून रिया मोरे आदींचा समावेश आहे. उर्वरित नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची यादी येत्या दोन दिवसांमध्ये जाहीर करण्यात येणार आहे.

महाविकास आघाडीने यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही सोबत घेतले असून गुहागर नगरपंचायतीसाठी मनसेला दोन जागा सोडण्यात आल्या आहेत. उर्वरित जागेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्याशी जागा वाटपसंदर्भात चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसांत त्याचाही निर्णय होईल, असे आमदार जाधव यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 13/Nov/2025