Chiplun : शालेय स्तरावरील लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

चिपळूण : तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १६ वर्षांखालील शालेय स्तरावरील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे सोमवारी (दि. १०) पवन तलाव मैदानावर युवा नेते अनिरुद्ध निकम यांच्याहस्ते उद्घाटन झाले.

याप्रसंगी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर, सचिव राजेश सुतार, गोट्या भोसले, दादा लकडे, लतीफ परकार, संदेश गोरीवले, योगेश बांडागळे, सुनील रेडीज, सचिन कुलकर्णी, भाऊ देवरुखकर, उदय काणेकर उपस्थित होते. स्वागत अध्यक्ष दाभोळकर यांनी केले.

उद्घाटन सामना मेरी माता स्कूल व अलोरे हायस्कूल यांच्यात झाला. यात अलोरे हायस्कूलने विजय मिळविला. दरवर्षी राज्यस्तरीय सीझन बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते. गेल्या तीन वर्षांपासून शालेय स्तरावरील स्पर्धांनाही मोठा प्रतिसाद मिळत असून यंदाही या स्पर्धेत तालुक्यातील १० संघांनी सहभाग घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 13/Nov/2025