Khed : कशेडी-बौद्धवाडी रस्त्याचे डांबरीकरण होणार

खेड : कशेडी- बौद्धवाडी तालुक्यातील येथील रस्ता डांबरीकरणाचे काम रखडल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण त्वरित करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, असे साकडे ग्रामस्थांनी गृहराज्यमंत्र्यांना घातले होते. त्यानुसार या रस्त्याच्या कामाला चालना देण्याचे आश्वासन मंत्री कदम यांनी ग्रामस्थांना दिले.

कशेडी बौद्धवाडीतील ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी हा मार्ग सोयीचा ठरतो. या रस्त्याचे डांबरीकरण रखडल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. ही बाब रमेश दरेकर यांसह ग्रामस्थांनी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार चव्हाण यांनी रस्त्याची पाहणीही केली. या प्रसंगी भगवान शेलार, माजी सरपंच भास्कर दरेकर, अर्चना तांबे उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 PM 13/Nov/2025