रत्नागिरी : 5 ऑक्टो.जागतिक शिक्षक दिनानिमित्त आविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर द्वारे 20 ऑक्टोबर 2024 रोजी राजर्षी शाहु महाराज स्मारक भवन येथे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रीय जलतरणपटटू व “क्रिडा कार्यकर्ती 2015” म्हणुन शासकीय क्रीडा पुरस्कार प्राप्त तसेच गेली 6/7 वर्ष मराठा मंदिर ग्लोबल स्कूल (CBSE) मध्ये जलतरण क्रिडा शिक्षिका म्हणुन कार्यरत असणाऱ्या सौ. मनिषा संजय बेडगे यांना कोल्हापूरच्या आविष्कार फाऊंडेशन, इंडिया यांचे मार्फत दिला जाणारा सन 2024 चा राज्यस्तरीय “क्रिडा रत्न”पुरस्कार नुकताच कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत श्री. किसनराव कुऱ्हाडे , जेष्ठ पत्रकार श्री. ताज मुलाणी, श्री. सुरेश उगरे व श्री. शिवाजी कोरवी – संचालक, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, कोल्हापूर, दत्तात्रय सुर्यवंशी – आविष्कार फाऊंडेशन ,श्री. रंगराव सुर्यवंशी – कोल्हापूर अध्यक्ष आविष्कार फाऊंडेशन, सौ. माधुरी सावंत – भोसले आणि आविष्कार फाऊंडेशन चे सर्वेसर्वा व पत्रकार श्री. संजय पवार – अध्यक्ष इत्यादी अनेक मान्यवरांच्या हस्ते सौ. मनिषा बेडगे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, नांदेड, लातूर, अमरावती, जालना, कोल्हापूर, हातकणंगले इत्यादी महाराष्ट्रातील 28 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. “क्रिडा रत्न”या एकमेव राज्य पुरस्काराने रत्नागिरी जिल्ह्यातील मनिषा बेडगे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे पती श्री. संजय बेडगे, दोन मुलगे, सासू सासरे व संपूर्ण बेडगे परिवार उपस्थित होता. मराठा मंदिर ग्लोबल स्कूल प्रिन्सिपॉल,प्रशासन अधिकारी – कर्मचारी व समाजातील प्रतिष्ठत वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:53 24-10-2024












