Ratnagiri : एनसीसीच्या कोकण विजय २६ सागर नौकाभ्रमण मोहिमेअंतर्गत पूर्णगड शाळेत विविध उपक्रम

रत्नागिरी : महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिट तर्फे कोकण विजय २६ सागरी नौका भ्रमण मोहिमेअंतर्गत तालुक्यातील जि. प. शाळा पूर्णगड नं. १ शाळेत विविध अॅक्टिव्हिटी सादर केल्या. यामध्ये स्वच्छ, सुंदर, समृद्ध कोकण यावर आधारित उत्तम अशाप्रकारचे पथनाट्य सादर केले व जनजागृती केली. तद्नंतर रॅली काढून पर्यावरण जागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये संघभावना, शिस्त, साहसीवृत्ती याविषयी माहिती माहिती दिली. शिडाची जहाजे, विविध बोटी यांचे कार्य कसे चालते याची माहिती उत्तम प्रकारे दिली.

उपस्थित सर्व अधिकारी, एनसीसी कॅडेट यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर, तृप्ती शिरगावकर यांनी केले व संपूर्ण टीमला धन्यवाद देण्यात आले. शाळेच्या या उपक्रमाविषयी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षण बीट विस्तार अधिकारी पावस श्रीमती हिरवे, केंद्रप्रमुख संजय राणे यांनी समाधान व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 14/Nov/2025