पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

मुंबई : देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि.14) महाराष्ट्र राजभवन येथे त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पं. नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक ले. विक्रम कुमार तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राजभवन येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व अमलदारांनी देखील पंडित नेहरू यांना अभिवादन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:21 14-11-2025