Kirnotsav 2025: सातव्या दिवशी किरणे श्री अंबाबाईच्या खांद्यापर्यंत

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात गुरुवारी मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या खांद्यापर्यंत पोहोचून लुप्त झाली. मात्र, किरणांची तीव्रता कमी होती.

किरणोत्सवाच्या सातव्या दिवशी ढगाळ वातावरण असल्याने हवेत बाष्प व धुक्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे किरणांची तीव्रता कमी हाेती. सोनेरी किरणांनी सायंकाळी ५:०० वाजता मंदिर महाद्वारातून मंदिरात प्रवेश केला. ही सूर्यकिरणे हळूहळू ५ वाजून ३४ मिनिटांनी पितळी उंबऱ्यावर पोहोचली. नंतर चरणस्पर्श करत गुडघ्यापर्यंत पोहोचली.

सायंकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी देवीच्या हातातील म्हाळुंगापर्यंत, त्यानंतर ५ वाजून ४७ मिनिटांनी देवीच्या उजव्या बाजूला खांद्यापर्यंत पोहोचली. काही वेळ स्थिरावून लुप्त झाली. त्यानंतर मंदिरामध्ये देवीची आरती होऊन हा सोहळा पार पडला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 14-11-2025