Crime News : चिपळुणात मोटारसायकल चोरी प्रकरणातील प्रौढावर गुन्हा दाखल

चिपळूण : शहरातील रामतीर्थ तलाव ते मुरादपूरदरम्यान रोडवर चोरीची मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी सुधाकर रामभाऊ सुर्वे (वय ५७, रा. मुरादपूर) याच्यावर ही गाडी चोरण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी फिर्याद दिली आहे.

दि. १३ नोव्हेंबर रोजी हा प्रकार उघडकीस आला. आरोप सुधाकर सुर्वे याच्या ताब्यात असणाऱ्या अॅक्टिव्हा ५जी या लाल रंगाच्या गाडीबाबत पोलिसांना संशय निर्माण झाला. ही गाडी संशयितरित्या आढळून आली. या शिवाय संबंधित सुर्वे याने गाडीच्या मालकीबाबत समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे त्याने गाडी चोरून आणल्याची खात्री पोलिसांना झाली. त्यानंतर चिपळूण पोलिसांनी त्याच्याविरोधात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 15/Nov/2025