Khed : तळवटपाल येथे ६० वर्षीय व्यक्तीला गावठी हातभट्टीच्या दारूसह अटक

खेड : तालुक्यातील तळवटपाल, देवूळवाडी परिसरात विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या ६० वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई १३ रोजी दुपारी २.०५ वाजता करण्यात आली.

खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी प्रशांत विनायक वाघ यांनी तक्रार दाखल केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख गणेश चंदराव पालांडे (वय ६०, रा. तळवटपाल, देवूळवाडी, ता. खेड) अशी आहे. आरोपीकडे विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेली आढळल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

या छाप्यात एकूण ४,०२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये ३४ लिटर गावठी हातभट्टीची दारू (किंमत ४,००० रुपये), इतर दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्याचा समावेश आहे. याबाबात पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 15/Nov/2025