Khed : रेल्वे पुलाखाली अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या १९ वर्षीय युवकाला गांजासह अटक

खेड : खेड शहरातील रेल्वे पुलाखाली अमली पदार्थांचे सेवन करताना एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात खेड पोलिसांना यश आले. ही कारवाई गुरुवारी दि. १३ रोजी दुपारी सुमारे ३.४५ वाजता मौजे वेरळ येथे करण्यात आली. खेड पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई विजेंद्र रमेश सातार्डेकर यांनी केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख प्रियांश संजय विवार (वय १९, रा. आवाशी, ता. खेड, मूळ रा. अकछोर, जि. सोनभद्र, उत्तरप्रदेश) अशी करण्यात आली आहे. आरोपी गांजा सेवन करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 15/Nov/2025