रत्नागिरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी (elections) गुरुवारी जिल्ह्यात (district) तिसऱ्या दिवशी 4 मतदार संघात (constituencies) 9 उमेदवारांनी 17 नामनिर्देशनपत्र (nominations) दाखल केली आहेत.
रत्नागिरी विधानसभा मतदार संघात अद्याप एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी (District Magistrate) तथा जिल्हा निवडणूक अधिकारी (Election Officer) एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी दाखल झालेल्या विधानसभा मतदार संघनिहाय (constituency-wise) नामनिर्देशन पत्रांची माहिती पुढीलप्रमाणे:
263 – दापोली विधानसभा मतदार संघ
कदम संजय वसंत (Shiv Sena – उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि कदम योगेश रामदास (Shiv Sena) यांनी प्रत्येकी 1 नामनिर्देशन पत्र दाखल केले.
264 – गुहागर विधानसभा मतदार संघ
जाधव भास्कर भाऊराव (Shiv Sena – उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी 2 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत.
265 – चिपळूण विधानसभा मतदार संघ
प्रशांत बबन यादव (Nationalist Congress Party – शरदचंद्र पवार) आणि स्वप्ना प्रशांत यादव (Nationalist Congress Party – शरदचंद्र पवार) यांनी प्रत्येकी 3 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत.
266 – रत्नागिरी विधानसभा मतदार संघ
रत्नागिरीत अद्याप एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नाही.
267 – राजापूर विधानसभा मतदार संघ
किरण रविंद्र सामंत (Shiv Sena) यांनी 3, राजन प्रभाकर साळवी (Shiv Sena – उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी 2, अविनाश शांताराम लाड (Independent) आणि यशवंत रामचंद्र हर्यान (Independent) यांनी प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्र दाखल केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 25-10-2024












