खेड : मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका परिसरात १३ रात्री झालेल्या अपघातात दोन पादचारी जखमी झाल्या. रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास एसएमएस हॉस्पिटलसमोर ओलांडत असलेल्या दोघींना अज्ञात मोटारसायकलस्वाराने जोरदार धडक दिली आणि तो घटनास्थळावरून पसार झाला.
रस्ता या अपघातात वैशाली तुषार राऊत (वय २१) आणि प्रतीक्षा प्रल्हाद खडके (१४), दोन्ही रा. भरणे या गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका पुलाखाली तैनात असणारी श्री जगद्गुरु नरेंद्राचार्यजी संस्थानची आपत्कालीन रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 15/Nov/2025












