राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या सहर्वत्रिक निवडणुकीत पाचव्या दिवशी एकही अर्ज सादर झाला नाही. त्यामुळे आता राहिलेल्या दिवसांमध्ये अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची मोठी गर्दी पहावयास मिळणार आहे. गेल्या पाच दिवसांत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक म्हणून प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाले असून नगरसेवक पदासाठी दाखल झालेला अर्ज राकेश सुनिल खटावकर, वरचीपेठ राजापूर यांनी प्रभाग ४, व मधून अपक्ष म्हणून सादर केला आहे तर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी श्रीमती ज्योती सुनील खटावकर यांनी (हिंदू महासभा) यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.
याव्यतिरीक्तअन्य कुणा उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले नाहीत. १७ नोव्हेंबर हि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख असून रविवार वगळता शनिवार आणि सोमवार असे दोनच दिवस शिल्लक असल्याने त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज सादर होतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 15/Nov/2025












