रत्नागिरी : तालुक्यातील खंडाळा बाजारपेठेत बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवणाऱ्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १.४० वा. सुमारास करण्यात आली. राजेश भिमाकांत पाटील (४९, रा. मालगुंड भंडारवाडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
त्याच्या विरोधात पोलिस शिपाई रविंद्र आठवले यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी दुपारी संशयित हा खंडाळा बाजारपेठ कांबळे लावगण फाटा येथील बंद दुकान गाळ्याच्या मागील बाजुला कल्याण मटका नावाचा जुगार खेळ चालवत होता. त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ५१९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयिता विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 15/Nov/2025












