खेड : शाळेतील चार विद्यार्थी अचानक बेशुद्ध पडल्याने खळबळ

खेड : खेडमधील देवघर येथील शाळेतील चार विद्यार्थी अत्यवस्थेत आढळून आले. शाळेतील विद्यार्थी अचानक बेशुद्ध झाले. या विद्यार्थ्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेडमधील देवघर इतं असलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. शाळेतील विद्यार्थी अचानक बेशुद्ध पडले. त्यामुळे शाळेत एकच खळबळ उडाली. यामध्ये तीन मुली एक मुलाचा समावेश आहे.

अधिक माहिती अशी की, खेड तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल देवघर-निवाची वाडी या शाळेतील विद्यार्थी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक बेशुद्ध पडले, त्यामध्ये एक मुलगा आणि तीन मुलींचा समावेश आहे. चौघांनाही घेऊन शाळेच्या मुख्याध्यापकांनी खाजगी गाडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. इयत्ता आठवी आणि दहावीतील हे विद्यार्थी असून अचानक चार विद्यार्थी बेशुद्ध का पडले, त्याचे कारण काय, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. सध्या 3 मुलींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सिद्धी गणेश पवार ( वय 13, जैतापूर. ता. खेड), मोहिनी रवींद्र पवार (वय 13 आठवी, मांडवे ता. खेड), निधी गजानन जाधव (वय 15, रसाळगाड ता खेड) आणि अन्य एक मुलगा युवराज सुधीर यादव देवघर अशी बेशुद्ध पडलेल्या मुलांची नाव आहे. या चौघांवर उपचार सुरू आहे. पण, बेशुद्ध पडण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. डॉक्टरांच्या देखरेखीखाली या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 25-10-2024