गुहागर : भाजपने २५ वर्ष मित्र असलेल्या शिवसेनेत फूट पाडली, राष्ट्रवादी फोडली; मात्र टायगर अभी जिंदा है। हे लोकसभेवेळी महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले. आता विधानसभा निवडणुकीतून इस बार महायुती तडीपार हे दाखवून दिले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी केले.
गुहागरला अर्ज भरणापूर्वी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. गुहागर विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरताना आमदार जाधव यांनी शक्तिप्रदर्शन केले. चिपळूणमधून गुहागरला येत असताना मालघर, रामपूर, मार्गताम्हाणे, देवघर या मार्गावर ठाकरे शिवसेनेचे स्वागत करण्यात आले. पालीत दुचाकी, चारचाकी गाड्या घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. एसटी बसस्थानकासमोर जाधव यांचा प्रचारसभा झाली. व्याडेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर अर्ज भरला. या वेळी यांच्यामावत सुवर्णा जाधव, समीर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख पद्माकर आरेकर, आरपीआयचे सुभाष मोहिते उपस्थित होते.
भास्कर जाधव म्हणाले, माझ्यासमोर सध्या विरोधकच नाहीत. गेले काही महिने शिवसेना गद्दार असल्याची पत्रके बाटली गेली. खोटयाचे खरे करणाऱ्या भाजपवाल्यांनी अनेकवेळा हिंदुत्वाशी आणि २०१९ मध्ये शिवसेनशी गद्दारी केली तसेच अजित पवार यांना सोबत घेऊन सत्ता मिळवण्याचा प्रयत्न प्रथम भाजपने केला. भाजपचे डॉ. विनय नातू हे साड्या वाटत फिरत होते. त्यांनी टीका करण्यासाठी निळूभाऊंना नियुक्त केले आहे. विपुल कदम नऊ कार्यालयांचे उद्घाटन करून गेले; मात्र आता त्यांना त्यांचे लोकच शोधत आहेत. त्यांना खिंडीत येऊ द्या मग त्यांना हिसका दाखवतो. समाजाचा ठाकरे शिवसेनेवर विश्वास गुहागरमधून माझ्यासमोर विरोधकच नाही असे आमदार जाधव यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 25/Oct/2024














