रत्नागिरी : रत्नागिरी टीआरपी साई एजन्सी स्टॉपजवळ डंपरच्या धडके दोन जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. हा अपघात इतका भीषण होता की डंपरने धडक दिल्यानंतर दोघे डंपरच्या मागच्या चाकात अडकून काही अंतर फरफटत गेले. डंपर सोबत फरफटत गेल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
मृत दोघांपैकी एकाची ओळख पटली असून दुसऱ्याच्या चेहऱ्याचा पूर्णतः चेंदामेंदा झाल्याने त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. मुक्तेश्वर ठीक (रा. विमानतळ प्रशांत नगर) असे एका मृत दुचाकिस्वराचे नाव आहे. डंपर कुवारबाव येथून जे. के. फाईलच्या मार्गाने जात होता तर मोटरसायकल चालक देखील याच मार्गाने जात होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 25-10-202