रत्नागिरी : वाकेड फाटा (ता. लांजा) येथे रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्याला वाहनाने धडक दिली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला. अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. स्वप्नील गणपत बराम (वय ४०, वाकेड, ता. लांजा) असे मृत पादचाऱ्याचे नाव आहे. ही घटना काल सकाळी नऊच्या सुमारास घडली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 17/Nov/2025














