खेड : खेड पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनियमितता रोखण्यासाठी आणि आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पालिका हद्दीत तीन ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत.
नगरपालिकेच्या १० प्रभागांमधील २० जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर सोनावणे आणि सहायक निवडणूक अधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली १०० हून अधिक कर्मचारी निवडणूक कामात सहभागी आहेत. पालिका हद्दीत स्वरूप नगर, भोस्ते येथील जगबुडी नदीकाठचा परिसर, तसेच खेड-दापोली मार्गावरील एकवीरानगर येथे स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 17/Nov/2025














