चिपळूणात प्रशांत यादव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

चिपळूण : महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत गुरुवारी दुपारी बरोबर १ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार तथा उद्योजक प्रशांत यादव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

महाविकास आघाडीतील सर्व स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन प्रशांत यादव यांनी गुरुवारी दिनांक २४ ऑक्टोबर दुपारी एक वाजताचा मुहूर्त उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडला होता. त्याअनुषंगाने तयारी देखील करण्यात आली होती. गुरुवारी सकाळीच प्रशांत यादव यांनी चिपळूण मधील देवीदेवतांचे सहकुटुंब दर्शन घेतले.

माजी मंत्री रवींद्र माने, जि.प. चे माजी अध्यक्ष रोहन बने उपस्थित होते. त्याचवेळी राजेंद्र महाडिक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शहा दाखल झाले आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत प्रशांत यादव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार रमेश कदम, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, राष्ट्रवादीचे निरीक्षक बबनराव कणावजे, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, काँग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांच्यासह चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सुभाषराव चव्हाण, सौ.चव्हाण, वैभव चव्हाण, सौ.स्वप्ना यादव देखील उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 25-10-2024