Khed : तिसंगी शिरगावात ९ ते १४ वयाच्या मुलींना लसीकरण

खेड : प्राथमिक आरोग्य केंद्र तिसंगी व उपकेंद्र शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि १४ रोजी शिरगाव हायस्कूल, दोन जिल्हा परिषद शाळा तसेच कुंभाड जिल्हा परिषद शाळा येथे लसीकरण सत्र यशस्वीपणे पार पडले. ९ ते १४ वयोगटातील सर्व पात्र मुलींना या सत्रात लस देण्यात आली.

लसीकरणावेळी प्रा. आ. केंद्र तिसंगी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा खेडेकर यांनी लसीचे महत्त्व, सुरक्षितता आणि भविष्यकालीन आरोग्य लाभ याबाबत सर्वसमावेशक मार्गदर्शन केले. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना त्यांनी आरोग्यविषयक आवश्यक माहितीही दिली.

या सत्रासाठी आरोग्य सहाय्यक एस. सी. पार्ट, आरोग्य सेविका सकपाळ (घाग), सिस्टर, तसेच शिक्षक डी. पी. चव्हाण, एस. जी. भुवड, एस. पी. फागे, सी. एच. उघडे आणि मदतनीस सुरेखा शिंदे यांनी सहकार्य केले. पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली. बहुतांशा सर्वांनी याचा लाभ घेतला आरोग्य विभागाच्या या उपक्रमाचे स्थानिक स्तरावर कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 17/Nov/2025