राजापूर मतदार संघात परिवर्तन करा, विकासाचे नवे पर्व सुरू होईल : ना. उदय सामंत

राजापूर : राजापूर मतदार संघाच्या रखडलेल्या विकासाला गती देतानाच एक विकसित मतदार संघ म्हणून नावारूपाला आणण्यासाठी महायुतीने किरण सामंत यांच्यासारखा रात्रंदिवस काम करणारा आपल्या हक्कचा उमोदवार या मतदार संघातुन दिला आहे.

या मतदार संघात परिवर्तन करून आपल्याला विकासाचे नवे पर्व सुरू करायचे आहे. त्यासाठी सज्ज व्हा विजयाचा गुलाल आपणच उधळणार असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

आजची गर्दी पहाता आपण आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलेले आहे. मात्र पुढील कालावधीत घराघरात पोहचून सरकारचे काम जनतेपर्यंत पोहचवा असे आवाहनी ना. सामंत यांनी केले.

जिल्हयात महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अतिशय प्रामाणिकपणे व जिद्दीने काम करत आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हयातील सर्व जागा या महायुती जिंकणार आहेच पण रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व जागा आपण जिंकणार आहोत असा दावाही ना. सामंत यांनी केला. राजापूर मतदार संघाच्या भविष्यातील विकासासाठी तुम्ही किरण सामंत यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा विजयाचा गुलाल आपणच उधळणार असा विश्वासही ना. सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 25-10-2024