Ratnagiri : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याचे आवाहन

रत्नागिरी : जिल्ह्यातील माजी सैनिक/ विधवांचे पाल्यांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता १० वी, १२ वी, पदवीका, पदवी व पदव्युत्तर परीक्षेमध्ये किमान ६० टक्के गुणासह उत्तीर्ण झालेले आहेत, अशा पाल्यांसाठी शिष्यवृत्ती व विद्यावेतन योजने अंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते.

तरी जिल्ह्यातील माजी सैनिक/विधवा यांनी आपल्या पात्र पाल्यांचे अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी (दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२७१) येथे संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 18/Nov/2025