गुहागर : मतदारांमध्ये मतदानाबाबत जाणीव जागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी वेलदूर नवानगर मराठी शाळेतर्फे मतदान जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वेलदूर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर कोळथरकर, अंजली मुद्दामवार, सुषमा गायकवाड, धन्वंतरी मोरे, अफसाना मुल्ला व शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.
या फेरीत घोषवाक्य तसेच घोषणा देण्यात आल्या. पं. स.चे गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे यांनी जि. प.च्या सर्व शाळांमध्ये स्विप उपक्रम अंतर्गत मतदान जनजागृती उपक्रमाच्या आयोजनासाठी आवाहन केले होते. त्यानुसार प्रभात फेरीद्वारे जनजागृती करण्यात आली. केंद्रप्रमुख आरोही शिगवण, मुख्याध्यापक मनोज पाटील, समितीच्या शाळा व्यवस्थापन अध्यक्षा शिल्पा कोळथरकर व उपाध्यक्ष संजना फुणगुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती फेरी काढण्यात आली. या जनजागृती फेरीला ग्रामस्थांचेही सहकार्य लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 25/Oct/2024












