General Election 2025 : देवरुखात तीन स्थिर सर्वेक्षण पथके तैनात

साडवली : देवरूख नगरपंचायत निवडणुकीची धामधूम जोरात सुरू असून, कार्यकर्ते जोशात आहेत; मात्र या निवडणुकातून कोणताही पैशांचा गैरव्यवहार होऊ नये यासाठी शहरात येणाऱ्या तीन ठिकाणी तीन सर्वेक्षण पथके व फिरते पथक तैनात केले आहे.

ठाकरे गट शिवसेना, शिंदेगट शिवसेना, भाजप, रिपब्लिकन पक्ष, मनसे, गावविकास समिती, समाजवादी, आप आदी पक्षांचे कार्यकर्ते या शहरात असून, सध्या प्रचाराचा धुरळा सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना आर्थिक आमिष दाखवून भुलवण्याचा प्रयत्न होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी तिन्ही बाजूने शहरात येणाऱ्या रस्त्यांवर निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत पथके तैनात केली आहेत.

मार्लेश्वरफाटा येथे फिरते पथक प्रमुख निरंजन सोलकर व त्यांचे सहकारी गणेश काटकर तसेच स्थिर पथकप्रमुख जयदीप जाधव, पोलिस अमोल कोठावळे, व्हिडिओग्राफर ताज बोबडे हे प्रत्येक गाडीची तपासणी करत आहेत. पाटगावतिठा येथेही असेच एक स्थिर पथक आहे तसेच सह्याद्रीनगर तिठ्यातही स्थिर पथक आहे. त्यामुळे देवरूख शहरात येणाऱ्या प्रत्येक गाडीवर बारीक नजर असून, तपासणी केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 18/Nov/2025