Ratnagiri Gogate-Jogalekar College | गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे एड्स जनजागृती उपक्रम

रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वयंसेवकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील एचआयव्ही माहिती व तपासणी केंद्राला भेट देऊन एड्स व गुप्तरोग जनजागृती उपक्रमात सहभाग घेतला. याद्वारे जागरूक समाज-निरोगी समाज हा संदेश देण्यात आला.

या भेटीदरम्यान स्वयंसेवकांनी एचआयव्ही-एड्सविषयक जनजागृती केली, घोषवाक्ये दिली आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी आरोग्यविषयक चर्चा केली. यामधून स्वयंसेवकांना एचआयव्ही-एड्स प्रतिबंध, निदान व उपचाराबाबत सखोल माहिती मिळाली. एनएसएस स्वयंसेवकांनी एचआयव्ही-एड्समुक्त समाजासाठी जनजागृती हेच शस्त्र या घोषणांनी परिसर दुमदुमला. स्वयंसेवकांना जनजागृती पत्रकांचे वितरण करण्यात आले. या वेळी सचिन पाटील, सतीश कांबळे, राहुल खरात, प्रा. सचिन सनगरे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 18/Nov/2025