Chiplun : डेरवण येथे मैदानी निवड चाचणी शुक्रवारीपासून सुरू

रत्नागिरी : भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि भारतीय अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने पहिली अस्मिता जिल्हा लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुणवत्ता शोधमोहिमेंतर्गत ही स्पर्धा १४ व १६ वर्षांखालील मुलींसाठी घेण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा अस्मिता लीग २१ ला डेरवण येथील एसव्हीजेसिटी क्रीडासंकुलात होईल.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १४ वर्षांखालील मुली २१ डिसेंबर २०११ ते २० नोव्हेंबर २०१३ या कालावधीत जन्मलेल्या असाव्यात. १४ वर्षांखालील मुलींसाठी ट्रायथलॉन ‘ए’ गटात ६० मी. धावणे, लांब-उंच उडी असे प्रकार असतील. ट्रायथलॉन बीमध्ये ६० मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक), ट्रायथलॉन सीमध्ये ६० मीटर धावणे, ६०० मी. धावणे, लांब उडी असे क्रीडाप्रकार समाविष्ट आहेत. खेळाडूंनी यामधील एक ग्रुप निवडायचा आहे. १६ वर्षांखालील मुली २१ डिसेंबर २००९ ते २० डिसेंबर २०११ या कालावधीत जन्मलेल्या असावेत.

या गटासाठी ६० मीटर धावणे, ६०० मी. धावणे, लांब, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक असे क्रीडाप्रकार आहेत. या स्पर्धेसाठी प्रवेश फी आकारण्यात येणार नाही. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळा कदम, उपाध्यक्ष श्रीकांत पराडकर, प्रशिक्षक अविनाश पवार यांनी केले आहे.

गुगल फॉर्मवर नोंदणी
खेळाडूंनी २१ ला सकाळी ९ वा. डेरवण (ता. चिपळूण) येथील एसव्हीजेसिटी क्रीडासंकुलात उपस्थित राहायचे आहे. सोबत येताना जन्मदाखला व आधारकार्ड आणणे आवश्यक आहे. प्रवेश नोंदवण्याची अंतिम तारीख १९ नोव्हेंबर राहील, असे असोसिएशनतर्फे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव संदीप तावडे यांच्याशी संपर्क साधावा. तसेच स्पर्धा नावनोंदणीसाठी गुगल फॉर्म वितरित करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 18/Nov/2025