खेड : कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेने प्रवास करणाऱ्या ६१ वर्षीय वृद्धेचा खेड स्थानकात आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी रात्री १.४५ सुमारास कोकण कन्या एक्सप्रेस मध्ये घडली
रेखा अनंत जाधव )वय ६१ वर्षे, रा, मु.पो. भालावली, ता. राजापुर, जि रत्नागिरी) असे त्या निधन झालेल्या वृद्धेचे नाव आहे. कोकण कन्या एक्सप्रेस या रेल्वेमध्ये रत्नागिरी ते मुंबई असा प्रवास करण्यासाठी जनरल डब्यात बसले होते. रेखा अनंत जाधव या दम्याचे व खोकल्याचे पेशंट होत्या. त्याच्यावर औषधोपचार देखील चालु होते. कोकण कन्या एक्सप्रेस ने प्रवास करीत असताना मयत यांची संगमेश्वर रेल्वेस्टेशन येथे आल्यानंतर कोणतीही हालचाल जाणवली नाही म्हणुन खबर देणार यांनी नातेवाईकांना त्याचे बाबत कळविले परंतु सदरची माहीती कोणीतरी रेल मदत अँपवर पाठविल्याने रेखा जाधव खेड रेल्वेस्टेशन प्लॅटफॉर्म वरती उतरविण्यात आले. त्यावेळी त्या ठिकाणी १०८ अॅम्बुलन्स मधील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासुन रेखा अनंत जाधव यांना मयत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 25-10-2024












